प्रतिनिधी / शाहुवाडी
शाहुवाडी मलकापूर मार्गावर वाहनांची वर्दळ उताराचा रस्ता रिक्षात प्रवासी बसलेले आणि रिक्षाचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच रिक्षाला रोखण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखून बाहेरील नागरिकांना आवाज दिला वेळेचं गांभीर्य बघून धावत्या रिक्षाला नागरिकांनी रोखल्याने अखेर रिक्षातील प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
चालकाचा आवाज ऐकून अनेकजण रिक्षाच्या पाठीमागून धावू लागले समोर माणसांची गर्दी त्यातच उभी राहिलेली वाहने अशा वेळी तात्काळ नागरिकांनी रिक्षा रोखल्याने पुढील अनर्थ टळला आणि रिक्षा थांबताच रिक्षातील प्रवाशांसह चालकाने एक सुटकेचा श्वास घेतला रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याचे समजताच प्रवाशांचाही जीव टांगणीला लागला होता केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच एक मोठा अनर्थ टळला आणि आपण सुखरूप पोहोचले याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलून दिस होता.









