प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथे मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका , नागरीक यांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धाजंली अर्पण करून चिनी वस्तूंचा वापर करू नये यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली चिनने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला . दरम्यान गोगवे येथील शहीद जवान श्रावण माने यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांना ही श्रद्धाजंली वाहण्यात आली
चीनने भारताच्या विरोधी घेतलेली भूमिका आणि सुरू केलेला हल्ला याचा तीव्र निषेध म्हणून मलकापूर शहरात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्वपक्षीय नगरसेवक , नागरीक , यांच्या वतीने सुभाष चौक मलकापूर. येथे चीनच्या या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमोल केसरकर म्हणाले की आज चीन विश्वास घातकी कुटील डाव करत असून आपल्या सैनिकांशी अमानुषपणे वागत आहेत आज पर्यंत त्यांच्या वस्तूंनी आपल्या बाजारपेठेत पैसा मिळवून उलट भारता विरोधीच कारवाई सुरू केली आहे याबद्दल त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.
या वेळी नुतन उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, विरोधी पक्षनेते बाबासो पाटील , मधुकर लाड , नगरसेवक सुहास पाटील , रमेश चांदणे यांनी ही तीव्र भावना व्यक्त केल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध असून यापुढे मलकापूर बाजार पेठेतील व्यापार्यांनी चिनी वस्तू विकू नयेत व ग्राहकांनीही अशा वस्तूंची खरेदी करू नये असे आव्हान करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक दिलीप पाटील, नगरसेवक भारत गांधी, विकास देशमाने , नगर्सेविका माया पाटील, शालन सोनावळे , सोनिया शेंडे , माजी नगराध्यक्ष राजू भोपळे , मलकापूर अर्बनचे संचालक सुरेंद्र कोठावळे, सागर पाटील यांच्या सह शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी नागरीक, युवक उपस्थित होते.









