प्रतिनिधी / कराड :
मंगळवारी रात्री झालेल्या किरकोळ वादातून बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एकावर वार करत चाकूने भोकसल्याची घटना मलकापूर ता. कराड येथे घडली. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर मलकापूर, ता. कराड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मलकापूर येथील अहिल्यानगर परिसरात मंगळवारी युवकांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली होती. यातून बुधवारी सकाळी विश्वास येडगे याच्यावर संशयितांनी धारदार शस्त्राने वार केले. यात विश्वास येडगे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तात्काळ कृष्णा रूग्णालयात हलवले. या घटनेची माहिती समजताच पोलीस मलकापूर फाटा परिसरात दाखल झाले. या घटनेची चौकशी सुरू असून संशयितांचा शोध सुुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.









