वृत्तसंस्था/ लखनौ
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळविण्यात आला नाही. मात्र अंतिम फेरी गाठलेल्या फ्रान्सच्या अरनॉड मर्कल आणि लुकास क्लेरबोट या दोन्ही बॅडमिंटनपटूंना समान मानांकन गुण त्याचप्रमाणे बक्षिसांची रक्कमही विभागून देण्यात येणार आहे.
रविवारी पुरूष एकेरीचा अंतिम सामना खेळविला जाणार होता. या स्पर्धेत एकेरीत प्रवेश मिळविणाऱया एका बॅडमिंटनपटूंला कोरोनाची बाधा झाल्याने तसेच दुसरा खेळाडू बाधिताच्या संपर्कात आला असल्याने आयोजकांनी अंतिम सामना रद्द करण्यात आला. आता या दोन्ही बॅडमिंटनपटूंना समान मानांकन गुण तसेच बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात येणार असल्याचे बीडब्ल्यूएफने जाहीर केले









