कोरोनामुळे सिनेसफष्टीने आपले सर्व शुटिंग, कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेले दोन महिने सेलिब्रिटी घरी आहेत. सेलिब्रिटींच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतो, तो म्हणजे फिटनेस. पण कॉरन्टाइनच्या काळात सर्व जीम, फिटनेस स्टुडियोज बंद असल्याने कलाकार त्यांच्या इन्स्ट्रक्टरसोबत वर्कआऊट करू शकत नाहीत.

पण सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर आणि ब्रायन डिसुझा यांनी यावर तोडगा काढला आहे. हे सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर जोडपे सध्या व्हर्च्युअल क्लासेसद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. रीमा- ब्रायन ही जोडी मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या अमफता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्पफहा जोशी, प्राजक्ता माळी, सखी गोखले, सुव्रत जोशी, सिध्दार्थ मेनन अशा जवळ जवळ 25 ते 30 सेलिब्रिटींची फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे. लॉकडाउन झाल्यापासून रीमा आणि ब्रायन आपल्या फिटनेस फ्रिक विद्यार्थ्यांसाठी व्हिडीयो कॉलद्वारे रोज क्लासेस घेतात. यात अर्थातच स्नेहलता वसईकर, हृता दुर्गुळे, प्राजक्ता माळी, स्पफहा जोशी अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. आपल्या वर्कआउट ऑफ दि डे (वॉड) या फिटनेस स्टुडियोद्वारे रीमा वेंगुर्लेकर अष्टांग योगाचे ट्रेनिंग देते तर ब्रायन डिसुझा फंक्शनल ट्रेनिंग शिकवतो. वर्कआउट ऑफ दि डे (वॉड)ची संस्थापिका आणि फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर सांगते, सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. त्यामुळे जसं आपण आजारी पडू नये म्हणून वर्क फॉर्म होम करणं किंवा घरीच राहणं गरजेचं आहे तसंच शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ाही तंदरूस्त राहणंही गरजेचं आहे. त्यामुळेच आम्ही काही व्हर्च्युअल ग्रुप क्लासेस घ्यायला सुरूवात केली. यात जे आमच्याकडे पहिल्यापासून फिटनेससाठी येतात, त्यांनाच नाही तर नव्या स्टुडंट्सचाही समावेश आहे. कॉरन्टाइनमध्ये थोडा वेळ मिळालाय, तर आता काही दिवस स्वत:कडे पाहण्याचा संकल्प सोडलेल्या नवोदितांनाही आम्ही काही फ्री क्लासेसद्वारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय. या फिटनेस फ्रिक स्टुडंट्समध्ये काही मराठी सेलिब्रिटीही आहेत. त्यांच्यासाठी आम्ही व्हिडीयो कॉलद्वारे वैयक्तिक क्लास घेतो. मला आनंद आहे, लॉकडाउननंतर त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. ब्रायन डिसुझा म्हणतो, सततच्या धावपळीच्या आयुष्यात मग ते सेलिब्रिटी असो की, सामान्य माणूस आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे ह्या लॉकडाउनचा फिटनेसद्वारे स्वत:वर सकारात्मक बदल घडवून आणण्याची हिच वेळ आहे आणि मला आनंद आहे, की स्पफहा जोशी, हृता दुर्गुळे, दिप्ती केतकर, स्नेहलता वसईकर या माझ्या सेलिब्रिटी स्टुडंट्सनी स्वत:ला फिट ठेवण्याचा विडा उचललाय.’’









