डॉ. नीता दौलतकर यांचे मत
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषेचे तेज मराठी भाषेत आणि शब्दात आहे. त्यामुळे ती दृढ झाली आहे, असे मत डॉ. नीता दौलतकर यांनी व्यक्त केले.
एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे, शाखा बेळगाव आणि रान फिल्म प्रॉडक्शन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यावेळी त्या ‘कुसुमाग्रज यांचे जीवनकार्य ः क्रांतिकारी योगदान’ या विषयावर बोलत होत्या.
दौलतकर म्हणाल्या, ‘कुसुमाग्रज यांनी आपल्या कविता, कथा, कादंबरी, नाटक, लघुनिबंध, ललित लेखन, पटकथा, चित्रपटकथा, वृत्तपत्र लेखन, संवाद, समाजातील दाहकता, समाज प्रबोधन, शिक्षण व्यवस्था यांचे वेळोवेळी लेखन करून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.’
प्रारंभी चंद्रशेखर गायकवाड यांनी स्वागत केले. परिचय निखील भातकांडे यांनी करून दिला. याप्रसंगी प्रा. अशोक आलगोंडी, माजी नगरसेवक अनिल पाटील, आनंद गोरल, लक्ष्मण बांडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश शिंदे यांनी केले तर सुधीर लोहार यांनी आभार मानले.









