पुणे/प्रतिनिधी
पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे यांचा फोर्ब्स यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे आनंद देशपांडे यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवण्यात आलाय. देशपांडे यांचा गुरुवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश झालाय. देशपांडे यांच्याकडे सर्वसामान्य कुटुंबामधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. देशपांडे यांच्या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचं ‘फोर्ब्स’ने म्हटलं आहे. फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे. ही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते.