प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवजयंतीदिनी मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी महिपती बाबर यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय पाटील आणि विनायक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सात जणंना जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यामध्ये सुरेश पाटील यांचाही समावेश आहे. कोल्हापूर-सांगली विभागीय उपाध्यक्षपदी अश्विन वागळे यांना निवडण्यात आले.
जिल्हा कार्यकारिणी अशी, जिल्हाध्यक्ष, महिपती बाबर, कोल्हापूर, जिल्हा कार्याध्यक्ष, संजय पाटील,जिल्हा उपाध्यक्ष,विनायक वि. पाटील,सुरेश पाटील,विनायक ल.पाटील,प्रविण पाटील, प्रशांत कुटरे, अशोक खाडे, जिल्हा संघटक , सुशांत निकम, जिल्हा सहसचिव , संजय रणदिवे
.
मराठा समाजातील तरुणांच्या अडचणी सोडविणार, बैठकीत निर्धार
नूतन जिल्हा कार्यकारिणीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी शिवप्रतिमेसचे पूजन करून कामकाजास सुरुवात केली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, कार्याध्यक्ष संजय पाटील, विनायक पाटील, उपाध्यक्ष सुरेश पाटील आदींसह प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मराठा समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण व्यवसाय नोकरी मध्ये येणाऱया अडचणीं दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करण्यात आला. ‘सारथी’ या प्रशिक्षण संस्थेचे विभागीय कार्यालय त्वरित सुरू करणे तसेच मराठा तरुणांना शैक्षणिक कामाकरता होस्टेल सुविधा उपलब्ध करणे करता प्रयत्नशील राहण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर तालुका निहाय कार्यकारिणी लवकरच नियुक्त करून मराठा सेवा संघाच्या कार्यास गती निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाक्षत महिपती बाबर यांनी सांगितले.









