प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण देणे अशक्य असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोकण दौऱयावर असणाऱया फडणवीस यांनी मराठा आरक्षण विषयावर भाष्य केले. पत्रकारांनी त्यांना मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, ओबीसी कोटय़ातून आरक्षण देणे शक्य आहे काय? या विषयी छेडले असता ते म्हणाले, मराठा समाजाला एसईबीसीच्या माध्यमातून आरक्षण देण्याचा कायदा आम्ही केला होता. तो ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकविता आला नाही. त्यामुळे आरक्षण कायदा रद्द झाला. यापुढे राज्य सरकारने नवीन मागासवर्ग आयोग नियुक्त करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी. ओबीसी कोटय़ातून मात्र मराठा समाजाला आरक्षण देणे योग्य नाही. तसेच शक्यही नाही.
Previous Articleयाद राखा… तर हा संभाजीराजे आडावा येईल!
Next Article अन्यथा, मंत्र्यांना जिल्हय़ात फिरू देणार नाही!









