आमदार शिवेंद्रराजे यांनी लावली हजेरी
प्रतिनिधी / सातारा
मराठ्यांची राजधानी साताऱ्यात मराठा समाजाच्यावतीने गोलमेल परिषद कोडोली येथील सम्राट मंगल कार्यालयात सुरु आहे.
या परिषदेला आमदार शिवेंद्रराजे यांनी हजेरी लावली आहे. परिषदेत मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी, आरक्षणासाठी साधकबाधक चर्चा सुरु आहे. मराठा समाजाचे अभ्यासकांनीही हजेरी लावली आहे. या परिषदेला मार्गदर्शन आमदार शिवेंद्रराजे यांनी केले आहे. सुरेश पाटील यांच्यासह वरीष्ठांनी मार्गदर्शन केले.