क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
मराठा युवक संघ बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेवेळी भारतात पहिल्यांदाच शरीरसौष्टव विषयावर पीएचडी केलेल्या केएलएस गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक डॉ. अमित जडे यांचा खास गौरव करण्यात आला.
मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज खानापूर रोड येथे आयोजित केलेल्या स्पर्धेचे औचित्य साधून बेळगावचे ज्येष्ट शरीरसौष्टवपटू व क्रीडा निर्देशक डॉ. अमित जडे यांचा खास गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, पोलीस उपायुक्त चंद्रशेकर निलगार, संजय सुंठकर, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनील आपटेकर, शिवाजी हंगीरगेकर, सिद्धार्थ हुंदरे, दिगंबर पवार, प्रदीप अष्टेकर, संजय मोरे, शिवाजी हंडे, सुधीर दरेकर, सदानंद शिंदोळकर, धनंजय पटेल, मोहन बेळगुंदकर, रणजित मन्नोळकर, संजय चव्हाण सदानंद शिंदोळकर, महादेव चौगुले, बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अमित जडे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. बेळगाव श्री सारख्या जुन्या स्पर्धेवेळी माझा गौरव केल्याबद्दल मी मराठा युवक संघाचा ऋणी आहे. यापुढेही खेळाविषयी आपण पुढील वाटचाल करणार आहे, असे अमित जडे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आपटेकर यांनी केले.









