प्रतिनिधी /बेळगाव
मराठा जागृती निर्माण संघातर्फे वडगाव-येळ्ळूर रोड येथे रोपांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सीए वनिता बिर्जे, नलिनी पाटील, वर्षा बिर्जे यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. यावेळी गोपाळराव बिर्जे यांनी प्रत्येकाने जिथे शक्मय आहे तेथे एक तरी झाड लावावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी दीपक पाटील, अरुण कणबरकर, वेदांत बिर्जे आदी उपस्थित होते.









