नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
शिवसेना नेते खासदार संजय राऊत संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षण आणि इतर ११ महत्त्वाच्या विषयावर पाठपुरावा करण्यासाठी भेट घेणार असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले की, विरोधकांनी पहिले मराठा आरक्षण द्यावे आणि नंतर शिकवावे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि राज्याच्या विकासासंदर्भात काही विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व खसादरांना राज्यातील विषयांवर त्या त्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत शिवसेनेच्या सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, राज्यातील विकास कामे, मेट्रो, ब.ल.ड्र.क पार्क, पीक विमा अशा विषयांचा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेऊन मांडलेल्या ११ विषयांचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Previous Articleनाट्यकर्मींसाठी शासकीय विश्रामगृहात कक्ष आरक्षित
Next Article `नळपाणीपुरवठा’ची वीज जोडणी तोडू नका








