नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सत्ताधाऱ्यांची शिकवणी कमी पडली असल्याची खोचक टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्त दिलं आहे की, त्यांची शिकवणी लावू जर मराठा आरक्षणाचा विषय सुटत असेल तर आम्ही त्यांच्याकडे शिकवणी लावू असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सकाळी भेट घेतली त्यांनी आरक्षणाबाबत कायदेशी बाबींवर चर्चा केली. त्यामुळे शिकवणी आणि अभ्यासाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका आरक्षण द्या आणि मग आम्हाला शिकवा असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेना नेते संजय राऊत शिवसेनेच्या सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, राज्यातील विकास कामे, मेट्रो, ब.ल.ड्र.क पार्क, पीक विमा अशा विषयांचा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेऊन मांडलेल्या ११ विषयांचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं दानवे म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं सांगत राऊतांनी दानवेंवर निशाणा साधला.
अशोक चव्हाण सकाळी (२१ जुलै) माझ्याकडे आले होते. ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे काही कायदेशीरबाबी मांडल्या. आम्ही चर्चा केली. त्यामुळे ही शिकवणी वगैरे, अभ्यास वगैरे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहित आहे. हिंमत असेल तर बोलू नका. तुमच्या दरबारात आम्ही आलो होतो प्रधानमंत्र्यांना भेटायला. मुख्यमंत्री स्वत: आले होते. अजित पवार, अशोक चव्हाण देखील सोबत होते. अभ्यास कुणाला शिकवताय. तुम्ही आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा. नाही तर आम्हाला पण शिकवता येतं, असा अशा शब्दात राऊत यांनी दानवेंच्या टीकेचा समाचार घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








