ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूकीला सुरूवात झाली आहे. निवडणूकीला सुरुवात झाल्यावर काही वेळातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी मतदान केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांच्या ‘हनुमान चालीसा’च्या मुद्दाला त्यांनी निशाणा केला आहे.
केजरीवाल हनुमान मंदिरात केलेल्या पूजेविषयी बोलताना ते म्हणाले, केजरीवाल पूजा करायला गेले की हनुमान जीला अपवित्र करण्यासाठी? त्याने एका हाताने बूट काढला, त्याच हातात माळ घेतली.. त्यांनी काय केले? पुढे ते म्हणाले, जेव्हा बनावटी भक्त येतात तेव्हा असेच होते. मी पंडितजींना सांगितले, त्यांनी हनुमानजींना अनेक वेळा धुऊन टाकले.
दरम्यान, यावर केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी एका टीव्ही चॅनेलवर हनुमान चालीसा वाचली आहे, ज्याबद्दल भाजपचे लोक सतत माझी खिल्ली उडवत आहेत. काल मी हनुमान मंदिरात गेलो. आज माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध झाले, असे भाजपचे नेते सांगत आहेत. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? देव प्रत्येकाचा आहे. देव प्रत्येकाला आर्शिवाद देतो, अगदी भाजपवाल्यांचे देखील भले होऊ देत.