ऑनलाईन टीम / मुंबई :
देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ( 7 फेब्रुवारी) मेगाब्लॉक असणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा – मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4.05 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 10.25 ते दुपारी 3.44 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानका दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.









