बेंगळूर : राज्यात मंगळवारपासून दोन आठवडे कठोर निर्बंध जारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने मद्यविक्रीसंबंधी स्वतंत्र दिशानिर्देश दिले आहेत. मद्य दुकानांमध्ये केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेत पार्सल नेण्याची मुभा आहे. मद्य बाटलीबंद असावे. खुल्या स्वरुपात विक्री करू नये. एमआरपी दरानेच मद्यविक्री करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मॉल, सुपरमार्केटमध्ये मद्यविक्री करू नये. मद्यविक्रीवेळी मार्गसूचीचे पालन करावे. अन्यथा परवाने रद्द करण्यात येतील. एका व्यक्तीला 2 लिटरपेक्षा अधिक मद्यविक्री करू नये. केवळ बियर बाटल्यांची विक्री करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.









