ऑनलाईन टीम / इंफाल :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कडक निर्बंध जारी करण्यात आले आहे. त्यातच आता मणिपूरमध्ये देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अक्षरशः हाहाकार माजविला आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत राज्यात 18 ते 28 मे दरम्यान लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर मधील इंफाल पश्चिम, इंफाल पूर्व, विष्णूपुर, थौबल, काकचींग, चुराचांडपुर आणि उखरुल या सात जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.









