सोनसडय़ावरील परिस्थितीमुळे मुख्याधिकाऱयांकडून पाऊल
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडा येथील सद्यस्थिती पाहता ओला कचरा निर्माण करणाऱया सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमती अर्ज करावा, असे आवाहन मडगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी केले आहे. कारण सोनसडा येथील परिस्थिती सामान्य होण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मडग?ाव पालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले असून घरोघरी जाऊन या कंत्राटदार एजन्सीचे कामगार ओला व सुका कचरा गोळा करत असतात. त्यातच पालिका क्षेत्रातील हॉटेलांतील ओला व सुका कचरा पालिकेकडून उचलला जात असतो. सोनसडा येथे शुक्रवारी भीषण आग लागल्यानंतर तसेच तेथील बेलिंग यंत्रांना आगीत झळ पोहोचल्याने सुक्या कचऱयाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालिका इमारतीमागील जुन्या किरकोळ मासळी बाजारातील जागेत दोन बेलिंग यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच दररोज 10 टन सुका कचरा साळगाव प्रक्रिया प्रकल्पात 3 महिन्यांच्या कालावधीसाठी बेलिंग करण्यासाठी पाठविण्याच्या दृष्टीने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ना हरकत दाखल्यासाठी पालिकेने अर्ज केला आहे.
सोनसडय़ावरील वीजपुरवठा सध्या खंडित झाला आहे. त्यामुळे ओल्या कचऱयावरील प्रक्रियेच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेकडो टन ओला कचरा सोनसडा येथील शेडमध्ये पडून आहे. यात शेडमधील जागा व्यापली गेली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट्स तसेच ओला कचरा तयार होणाऱया अन्य आस्थापनांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क करण्यास नोटीस काढली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी स्वतःच्या आस्थापनाच्या जवळच्या जागेत खड्डा खोदून वा अन्य शास्त्राsक्त पद्धतीने ओल्या कचऱयाची विल्हेवाट लावल्यास पालिकेला सामोऱया जाव्या लागणाऱया समस्यांतून सुटका होण्याच्या बाबतीत हातभार लाभेल. यासाठी पालिकेने ही नोटीस बजावली असल्याची माहिती मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी दिली.









