प्रतिनिधी /मडगाव
मडगाव येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्याने व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून गिरीश केणी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु जिजामाता यांचा त्यांना घडविण्यात मोलाचा वाटा होता. त्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. महाराजांचे जीवन चरित्र शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे व त्यांच्या गुणांचे बीज आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे उद्गार गिरीश केणी यांनी यावेळी बोलताना काढले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्राथमिक विभागाचे विद्यार्थी विघ्नेश शेट देसाई (शिवाजी महाराज), तनिश फळदेसाई (शिवाजी महाराज), ईशायु नाईक (शिवाजी महाराज), सार्थक भट (शिवाजी महाराज), स्विधि बांदेनवर (जिजामाता), शौर्या पारकर (जिजामाता), जीविका फळदेसाई (जिजामाता), नक्षत्रा लोकरे (जिजामाता), रुही केरकर (जिजामाता), पूर्वशी कटेकर (राणू अक्का) यांनी वेशभूषा सादर करून सर्वांची मने रिझविली.
विद्यार्थी यथार्थ सतरकर (शिवाजी महाराज), हर्ष मांदेकर (अफझल खान), वेदांत शेट देसाई (सरदार), मिथिल आगापूरकर (सरदार), समर्थ बोरकर (जीवा महाला), मंथन आगापूरकर (पंत), वंशी कुडाळकर (जिजामाता), शिक्षिका सौ. वर्षा देसाई, सौ. अंकिता सावंत, सौ. समीक्षा पिंगे यांनी नाटय़मय पोवाडे सादर केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांकरिता वेशभूषा सादरीकरण, पोवाडा सादरीकरण व किल्ला बनविणे हे उपक्रम राबविण्यात आले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक दत्ता नाईक, दिनेश गवंडी, अभय खंवटे, सुहास कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राज्याभिषेकाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रोहिणी बांदोडकर यांनी तर शिक्षिका सौ. अर्चना शेटकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.









