मजगाव : मजगावच्या मुख्य रस्त्यावरील चर नाईट सेक्मयुरिटीनी बुजविली. त्यामुळे वाहतुकदारांत समाधान पसरले आहे.
मजगाव मेन रोड आय. टी. आय. कॉलेजसमोर भलीमोठी चर पडलेली होती. त्यामध्ये रात्रीच्यावेळी अनोळखी चालकांचे फार नुकसान होत होते तर अनेक जण अपघातग्रस्त होत होते. या ठिकाणी नजिकच्या कारखान्यांच्या रात्रीपाळीचे सेक्मयुरिटी गार्डनी पुढाकार घेऊन बुधवारी सकाळी माती घालून सदर चर बुजविली.
दि. 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत मजगावमध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या प्रतिष्ठापनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आपण सदर रस्त्यावरील चर बुजविल्याचे सांगितले. मधुकर डी. जाधव, सुरेंद्र टी. पाटील व नंदकुमार पी. कागे यांनी चर बुजविल्याबद्दल वाहतुकदारांनी त्यांचे आभार मानले.









