ऑनलाईन टीम / मुंबई
कोरोना परिस्थिती आणि सरकारच्या कामावरुन विरोधकांकडून वेळोवेळी जोरदार हल्लाबोल केला जात आहे. मुख्यमंत्री हे घरात राहूनच राज्यकारभार करत असल्याची टिका भाजपच्या नेत्यांकडून होत होती. या टिकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चांगलाच खरपूस समाचार घेतला. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते त्यांनी विरोधकांबरोबरच कॉंग्रेसवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही म्हणून टीका करतायत. त्यांना मला इतकच सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल असे ठणकाहून सांगितले.
आपण लोकांना घरात राहायला सांगायचं आणि स्वतःच घराबाहेर पडायचं हे आपल्याला पटत नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. जनतेला मी वेळोवेळी घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नसल्याचे सांगत मी लवकरच बाहेर पडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
अनेकांच्या पोटात दुखतंय. पण शिवसेना त्यांना औषध देतेय. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमवा. मग वार करा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.
Previous Articleसांगली : करंजेत चक्क भर पावसात डांबरीकरण
Next Article कमर्शियल चित्रपट करण्याची इच्छा








