प्रतिनिधी/ सातारा
बाप से बेटी सवाई या वाक्याचा प्रत्यय पाटण तालुक्यातील जनतेला येऊ लागला आहे. मंत्री शंभूराज देसाई हे जनतेच्या हितासाठी कोरोना काळात प्रयत्न करत आहेत. तर त्यांची कन्या ईश्वरी हिने घरातच राहून छान पैकी पेंटिंग साकारत घरात रहा असा संदेश दिला आहे. लॉकडाऊन पूर्वी ईश्वरीचे दहावीच्या परीक्षेचे पेपर सुरू होते. तिने लॉकडाऊन काळात साकारली गेलेल्या चित्रांचे कौतुक होत आहे.
राज्याचे गृहमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे सामान्य जनतेसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या संकटात ही ते पोलीस, आरोग्य यंत्रणेबरोबर कोरोना योद्धचे मनोबल वाढवत आहेत. जनतेसाठी झटत आहेत, असे असताना घरात राहूनच आपल्या पित्याप्रमाणे जनतेला संदेश देण्याचे काम त्यांची कन्या ईश्वरी या करत आहेत. त्यांनी कोरोनच्या काळात घरात छान छान चित्रं कॅनव्हासवर साकारली आहे. आपल्या कलेतून त्या घरातच रहा स्वतःची काळजी घ्या असा संदेश देत आहेत. त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून त्यांच्या परीक्षेकरता नंबर अनंत इंग्लिश स्कुल येथे आला होता. त्याना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः गेले होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ईश्वरी यांनी साकारलेल्या चित्राची पाटणसह जिह्यात कौतुक होत आहे.









