तिसऱया टप्प्यातील लसीची चाचणी : 14 मंत्री-आमदारांचाही समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनावरील तिसऱया टप्प्यातील लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असून शनिवारी मंत्री, आमदार, आयएएस, आयपीएस अधिकाऱयांसह एकूण 120 जणांवर को-व्हॅक्सिनची चाचणी करण्यात आली. लस घेतलेल्या मंत्री, आमदारांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. को-व्हॅक्सिनची लस घेतलेल्यांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल परिणाम दिसून आलेले नाहीत.
भारत बायोटिक कंपनीने तयार केलेली को-व्हॅक्सिन लस आतापर्यंत 14 मंत्री आमदार, अधिकाऱयांसह स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. बेंगळूरच्या वैदेही इस्पितळात शनिवारी एकूण 120 जणांवर लसीची प्रायोगिक चाचणी करण्यात आली आहे. अलिकडेच 382 जणांना ही लस दोन डोसमध्ये देण्यात आली आहे. क्लिन ट्रक इंटरनॅशनल प्रा. लि. च्या संचालिका चैतन्या आदिकेशवलू यांनी ही माहिती दिली. लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये भीती असल्याने 14 मंत्री, आमदार आणि 98 आयएएस, आयपीएस अधिकाऱयांनी स्वयंप्रेरणेने ही लस घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा
सर्वसामान्यांमध्ये लसीविषयी विश्वास निर्माण व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱयांनी पुढाकार घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात आला आहे. लस घेतलेल्यांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा आरोग्यविषयक समस्या दिसून आलेल्या नाहीत. आतापर्यंत एक हजार जणांना प्रायोगिक टप्प्यात लस देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. परंतु, 424 जणांनाच ही लस देण्यात आली आहे. जनतेने स्वप्रेरणेने लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैदेही इस्पितळाच्या व्यवस्थापन मंडळाने केले आहे.









