मुंबई/प्रतिनिधी
आर्थिक गैरव्यवहार (money laundering) प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतर अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (minister anil parab) यांनी ईडीसमोर चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनी ईडी कार्यालयात (Enforcement Directorate) जाण्यापूर्वी स्वत: माध्यमांना मी ईडी कार्यालयात (ED) जाणार असून त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, अनिल परब यांनी बोलताना मला दोन समन्स बजावण्यात आले असून अद्याप त्यांनी चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही असं सांगत चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असं देखील ते म्हणाले. दरम्यान मध्यमनाशी संवाद साधून ते थेट ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.
ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी परब यांनी, “मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. मी शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितलं आहे की मी कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही. चौकशीत मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं दिली जातील. मला अजूनही चौकशीसाठी का बोलावलं आहे हे मला माहिती नाही. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल”, असं ते म्हणाले. परब आता ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते ईडीच्या चौकशाला सामोरे जाणार आहेत.








