मंड्या /प्रतिनिधी
मंड्या येथील विश्वेश्वरैया मेडिकल सायन्स (व्हीआयएमएस) रुग्णालयात संसर्ग झालेला कैदी पोलिसांना चकवा देऊन पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून फरारी कैद्याला शोधण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किलारा गावचा रहिवासी असलेला कुमार (वय 22) याला मित्रासह भिकारी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तुरुंगात त्याला ताप आला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तेंव्हा तुरुंगातील रुग्णालयात त्याची तपासणी झाली. याच कारणास्तव त्याला विम्समध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या वारंवार तपासणीनंतरही अहवाल सकारात्मक आला. त्याला तुरूंगात नेताना पोलिसांना चकवा देऊन तो येथून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









