बेंगळूर : मंगळूर जिल्हय़ातील उळ्ळाल येथील नर्सिंग कॉलेजमधील 45 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केरळमधून आलेले नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर उळ्ळाल नगरपालिका अधिकाऱयांनी महाविद्यालय व विद्यार्थी वसतिगृह सीलडाऊन केले आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालय आवारात 19 तारखेपर्यंत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाहे. खबरदारी म्हणून केरळमधून येणाऱया विद्यार्थ्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी. विद्यार्थी आणि नागरिकांनी कोविड मार्गसूचीचे पालन करावे, असेही नगरपालिकेने म्हटले आहे.
Previous Articleमॅनहोलमध्ये कर्मचाऱयांना उतरविल्यास कठोर कारवाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.