मंगळूर/प्रतिनिधी
मंगळूर येथे सुपरमार्केटमध्ये मास्क लावण्यास नकार दिल्याबद्दल मंगळूर शहर पोलिसांनी बुधवारी शहरातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला. काद्री येथील जिमीच्या सुपरमार्केटचे सह-मालक रायन रोजारियो यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी असा दावा केला की त्यांनी मास्क न लावताच रुग्णांवर उपचार केले होते, पण खरेदी करताना त्याला मास्कलावण्यास का भाग पाडले, असा सवाल त्याने केला आहे.
मंगळूर शहर पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेला माहितीनुसार, त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. “तक्रारीच्या आधारे आम्ही काद्री पोलीस स्टेशनमध्ये साथीच्या आजार कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव डॉ. श्रीनिवास कक्कलिया असे आहे.