प्रतिनिधी / बेळगाव

सेंट्रल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मराठा मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरला आर्थिक मदत देण्यात आली. तसेच सावरकरांच्या प्रतिमेचे व साहित्याचे यावेळी पूजन करण्यात आले.
वर्गमित्रांनी जमविलेला 61 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांकडे देण्यात आला. वर्गमित्र सचिन उसुलकर, हिंडलगा ग्रा. पं. सदस्य गजानन बांदेकर, संजय हिशोबकर, विनोद हंगिरकर, आदीनाथ सालगुडे, गिरीष धामणेकर, हभप राजू कावळे, अनिल नावगेकर, यशवंत परदेशी, विकास मांडेकर इत्यादी मित्रांच्या उपस्थितीत हा निधी देण्यात आला. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, अंकुश केसरकर यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.
कोरे गल्ली बी. सी. ग्रुपचा मदतीचा हात
कोरे गल्ली येथील बी. सी. ग्रुपच्या तरुणांनी एकत्रित येऊन 5 हजार रुपयांचा निधी म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला दिला. तसेच कुसुम परूळेकर यांनी 5 हजार रुपयांची मदत या सेंटरला केली.
यावेळी कोरे गल्लीतील पंच किरण पाटील, सुधीर नेसरीकर, गजानन शहापूरकर, भाऊ मजुकर, रवि जाधव, राजू गावडोजी, परशराम भातकांडे, विनायक चौगुले, उदय कडोलकर, शशि शहापूरकर, नागेश कुंडेकर, बाळकृष्ण सावंत, विनायक खराडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.









