प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षकदिनाच्या निमित्ताने भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेच्या पदाधिकाऱयांनी त्यांचे गुरु समाजसेवक शिवाजी कागणीकर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. संस्थेतर्फे अध्यक्ष ऍड. नामदेव मोरे, समाजसेवक नागेश देसाई, जयवंत साळुंखे, पवन देसाई, राहुल पाटील यांनी शिवाजी कागणीकर यांना जांभळाचे रोपटे, फळांची करंडी देऊन शाल अर्पण करून त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱया गोळय़ा देण्यात आल्या. याप्रसंगी सिनेदिग्दर्शक प्रशांत पाटील, अनिता बेळगावकर, कल्लाप्पा बेळगावकर व कागणीकर कुटुंबिय उपस्थित होते.









