उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, आँनलाईन वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर दिली माहिती
भोगावती/प्रतिनिधी
भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी आणि कारखान्याच्या सोयीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब म्हणूनच भोगावती अँप सुरु करण्यात आले. यामध्ये अद्यापही काही त्रुटी राहील्या असतील त्यांच्या दुरुस्ती केल्या जातील. मात्र अँपचा कारखान्यावर काहीच खर्च पडलेला नाही. तसेच २०१७/१८ च्या हंगामामधील प्रलंबित दोनशे रुपयांचा नव्हे तर अडीचशे रुपयाप्रमाणे थकीत रक्कम अर्थिक स्थिती सुधारल्यानंर देणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारखान्याच्या शनिवारी होणाऱ्या आँनलाईन वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पत्रकार परिषदेत झालेले आरोप व आँनलाईन ऐवजी आँफलाईन सभा घेण्याची शे.का. पक्षाच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी यासंदर्भात माहिती देण्यासाठी भोगावती येथे कारखान्याच्यावतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, आँनलाईन सभेसाठी सुशिक्षित की अशिक्षित सभासद असा भेदभाव करायलाच नको. त्याउलट आँनलाईन सभेसाठी सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.बाहेरील टोळ्यांनी आर्थिक बाबतीत परिसरातील बहुतांश वाहन मालकांची फसवणूक केली असल्याची जीवंत उदाहरणे आहेत. म्हणूनच आम्ही स्थानिक टोळ्या केल्याने ऊसतोडणी, ओढणीचा कार्यक्रम थोडा विस्कळीत झाला असल्याचे मान्य आहे. पण भोगावती मध्ये कधीही नो केन परिस्थिती आली नाही हेही फार महत्त्वाचे आहे.
कारखान्याच्या टायरगाडी खरेदी संदर्भात एका ठेकेदाराचा जी.एस.टी.नंबर नसल्याने संबधितांशी चर्चा करुनच व लिहुन घेऊनच ही खरेदी केली आहे. भोगावतीमध्ये सर्व निर्णय अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्याच परवानगीने घेतले जातात. तसेच अध्यक्ष पाटील यांचा राजकीय व्याप वाढल्याने कारखान्याच्या कारभाराकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या राजीनाम्याचे कोणीही राजकीय भांडवल करु नये अशी विनंती त्यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी कार्यकारी संचालक के.एस.चौगले, ज्येष्ठ संचालक किशाबापु किरुळकर, हिंदुराव चौगले, प्रा.सुनिल खराडे,शिवाजी कारंडे, कृष्णराव पाटील, रवींद्र पाटील तारळेकर, धिरज डोंगळे, प्रा.ए.डी.चौगले, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. तरी भोगावतीच्या इतिहासातील पहिल्याच आँनलाईन वार्षिक सर्व साधारण सभेत सर्व सभासदांनी सहभागी व्हावे, सभा कामकाजात भाग घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन सर्व संचालक मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









