भूत, पिश्चाच यांचा अभ्यास करणारे जोडपे एड आणि लॉरेन वॉरेन यांच्यासमोर नवे प्रकरण येते. आपल्याकडून झालेला खून हा एका भूताने करवून घेतला आहे असा दावा एक गुन्हेगार करतो. यामागचे सत्य शोधण्याची जबाबदारी या जोडप्यावर असते. द कॉन्ज्युरिंग 3 चे दिग्दर्शन मायकल चेव्ह यांनी केले असून वेरा फार्मिगा, पॅट्रीक विल्सन, ज्युलिअन हिलियर्ड, सारा पॅथरिन हूक यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत.
– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई









