नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघातील मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंग यांचे मीरत येथील निवासस्थानी गुरुवारी निधन झाले. मागील 8 महिन्यांपासून ते लिव्हर कॅन्सरशी झुंजत होते. निधनसमयी ते 63 वर्षांचे होते. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, किरण पाल सिंग यांना कॅन्सर झाल्याचे मागील सप्टेंबरमध्ये निदान झाले, त्यावेळी भुवनेश्वर संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएल स्पर्धेत खेळत होता. इंग्लंडमधील डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर एम्समध्ये त्यांच्यावर केमोथेरपी सुरु होती. अलीकडेच तब्येत आणखी खालावल्याने दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना खासगी इस्पितळात दाखल केले गेले होते. उत्तर प्रदेश पोलीस खात्यात उपनिरीक्षक म्हणून ते निवृत्त झाले होते.









