शिये/वार्ताहर
भुयेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सन २०२० ते २०२५ पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. करवीरचे मंडलाधिकारी अनिल काटकर, ग्रामसेविका उषा कांबळे, गावकामगार तलाठी हरीष शिंदे यांनी हे आरक्षण जाहीर केले. यावेळी सरपंच सविता पाटील, उपसरपंच सुवर्णा मिरजकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध गटाचे, पक्ष व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०१५ च्या जनगणनेनुसार ४६४४ लोकसंख्या असलेल्या भुयेवाडी गावात ३३०० मतदार आहेत. याठिकाणी पाच प्रभागात १३ जागा विभागण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण तीन, सर्वसाधारण महिला पाच, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला दोन, नागरीकांचा मागास प्रवर्ग पुरुष दोन, अनुसूचित जाती एक अशी विभागणी केली आहे.
प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे :
प्रभाग एक (जागा २): नागरीकांचा मागास प्रवर्ग एक, सर्वसाधारण महिला एक.
प्रभाग दोन ( जागा ३): नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक.
प्रभाग तीन( जागा ३) :नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक.
प्रभाग चार (जागा ३): नागरीकांचा मागास प्रवर्ग एक, सर्वसाधारण महिला १, सर्वसाधारण एक,
प्रभाग पाच( जागा २): अनुसूचित जाती सर्वसाधारण एक, सर्वसाधारण महिला एक.









