प्रतिनिधी – खेड
दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील भिलारे आयनी – खोतवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ५४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार कदम यांच्याहस्ते कामाचे भूमिपूजनही झाले. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची ४० वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास जात असून ग्रामस्थांची यातायात कायमचीच थांबणार आहे.
तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम व माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या विशेष सहकार्याने रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली होती. आमदार योगेश कदम यांनी निधी उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न केले. निधी मंजूर झाल्याने कामाचे भूमिपूजन पार पडले. या रस्त्यामुळे वाहतूक जलदगतीने होणार असून ग्रामस्थांच्या वेळेची बचत होणार आहे. याशिवाय प्रवास देखील सुखकर होण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजनदरम्यान आमदार योगेश कदम यांनी ग्रामस्थांच्या अन्य व्यथा जाणून घेत विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी जि.प. सदस्य अरूण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती विजय कदम, पंचायत समितीचे सदस्य गणेश मोरे, विभागप्रमुख संदिप कांबळे, श्रीधर कदम, दत्ता भिलारे, हनुमंत जाधव, स्वप्निल सुर्वे, तालुका आयटी सेल अधिकारी दर्शन महाजन, झिशान हमदुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









