चिपळूण \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये दाखल झाले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी स्थानिक नागरिकांशी गैरवर्तन केले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यानंतर आता चिपळूणमधील दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली आहे.
स्वाती भोजने असं या महिलेचं नाव आहे. स्वाती यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेताना ते उद्धटपणे बोलले नाहीत असं म्हटलं आहे. अजूनही आमच्याकडे लाईट नाही, मोबाइल चार्ज नाही त्यामुळे सोशल मीडियावर नेमका काय प्रचार सुरु आहे हे मी पाहिलेलं नाही. पण ते उद्धटपणे बोलले नाहीत. वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत, असं स्वाती यांनी सांगितलं. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत असंही यावेळी त्यांनी म्हटलं.
त्यांचा आवाजच तसा असल्याने गैरसमज होता. त्यांचं बोलणं कठोर आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात,” असंही त्यांनी सांगितलं. माझ्यावर कोणताही दबाव नाही. दबाव असता तर आमदार, खासदारांचा पगार काढला नसता. त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








