वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये असून यजमान इंग्लंडविरूद्ध होणाऱया एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय पुरुष संघातील फलंदाज अजिंक्य रहाणेने फलंदाजीच्या महत्त्वाच्या टिप्स दिल्याचे समजते.
भारताचे पुरूष आणि महिला संघ इंग्लंडच्या दौऱयावर आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडविरूद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रमुख प्रशिक्षक रमेश पोवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी या संदर्भात भारतीय पुरूष कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मिताली राजच्या महिला संघाला महत्त्वाच्या टिप्स दिल्याचे समजते. कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना तसेच शिखा पांडे यांना रहाणेकडून फलंदाजी संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले आहे.









