वॉलमार्ट इंकचे अध्यक्ष व सीईओ मॅकमिलन यांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली
भारत हा जगातील सर्वात अव्वल बाजारांपैकी एक आहे. हीच स्थिती येत्या काळात आणखी मजबूत होत वर्ष 2025 पर्यंत रिटेल क्षेत्रातील उलाढाल 1,000 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचणार असल्याचा विश्वास वॉलमार्ट इंकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डग मॅकमिलन यांनी व्यक्त केला आहे. वॉलमार्टच्या कार्यक्रमात बोलताना हे मत त्यांनी मांडले आहे.
विविधतेने भरलेल्या भारतात व्यवसाय वाढीसाठी संधी आहेत. त्यामुळे येणाऱया काळात भारतीय बाजारात स्पर्धा वाढणार आहे. आपल्या सारख्या कंपन्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेत कार्य करण्याची गरज असल्याचेही सीईओंनी स्पष्ट केले आहे.









