ओला-ऊबेर खटला प्रकरणात यश
म्हापसा / प्रतिनिधी
ओला आणी ऊबेर या एपबूस्ड टेक्सी संघटणास गोव्यात प्रवेश करण्यापासून राज्यातील दक्षिण तसेच उत्तर गोवा पर्यटक टेक्सी चालक संघटणाकडून बळाचा वापर करीत रोखण्यात आल्याचा आरोप असलेल्या तसेच गेली चार वर्षे सीसीआय मार्फत ( भारतीय प्रतिस्पर्धा आयोग ) यासंबंधात चाललेल्या दखलपात्र आरोपांतुन एकदाची मोकळीक मिळाल्याची माहिती टेक्सी असोशियशनचे दिल्लीस्थित वकील उज्ज्वल शर्मा तसेच ऍड. प्रशांत शिवराजन यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. दक्षिण तसेच उत्तर गोवा पर्यटक टेक्सी असोशियशनकडून कळंगुट येथील एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत वरील वकील द्वंयीकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, राज्यातील पर्यटक टेक्सी व्यवसायावर आपला अधिकार आणी नियंत्रण शाबूत ठेवण्याच्या हेतूने ओला तसेच उबेर या खाजगी एप बेस्ड टेक्सी संघटणास स्थानिक दक्षिण तसेच उत्तर गोवा टेक्सी असोशियशनकडून बळाच्या दमावर रोखून धरल्याचा खटला भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडून सु मोटो द्वारा खटला दाखल करून घेण्यात आला होता. दरम्यान, गेली चार वर्षाहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यात गोवा पोलिस खात्याचाही अहवाल संबंधित आयोगाकडून मागवून घेणात आला होता. तथापि, या प्रलंबित खटल्याचा निकाल देतांना ओला या एप- बेस्ड टेक्सी संघटणेकडून गोव्यात कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी वाहतूक खात्याकडून रितसर परवाना घेण्यात आलेला नव्हता तर उबेर टेक्सी व्यवसायाकडून 2013 मध्येच गोव्यातून गाशा गुंडाळण्यात आलेला होता या गोष्टी उघड झाल्याने या खटल्यातील स्थानिक टेक्सी असोशियशनची जमेची बाजू ठरल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सध्या राज्यात सुरु असलेल्या गोवा माईल्स या एप बेस्ड टेक्सी व्यवसायाने गोव्यात दम धरल्याचा आधार घेत आयोगाकडून स्थानिक दक्षिण तसेच उत्तर गोवा टेक्सी असोशियशनकडून ओला तसेच उबेर संघटणांं®³ाा विरोधात बळाचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा यावेळी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडून खोडून काढण्यात आला. दरम्यान, यापुढे सरकारकडून स्थानिक लोकांचा पारंपरिक टेक्सी व्यवसाय राज्याबाहरील लोकांच्या हाती देण्याचा प्रयत्न झाल्यास तो पुर्ण ताकदीनीशी हाणून पाडण्यात येणार असल्याचे उत्तर गोवा पर्यटक टेक्सी असोशियशनचे वासुदेव आरोलकर यांनी सांगितले.









