नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय नौदलाने एक मोठे सामरिक पाऊल उचलले आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागरात टेहळणी कार्यासाठी एका अमेरिकेच्या कंपनीच्या कडून भाडेतत्वावर दोन प्रिडेटर ड्रोन प्राप्त केले आहेत. हे ड्रोन पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केले जाऊ शकतात. चीनविरोधात भारत आणि अमेरिकेची नवी जुगलबंदी म्हणून या पावलाकडे पाहिले जाऊ शकते. हे ड्रोन भारतीय नौदलासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. या ड्रोन्समध्ये 30 तासांहुन अधिक काळापर्यंत उड्डाण करण्याची क्षमता आहे. हे ड्रोन भारतीय नौदलासोबत एक वर्षापर्यंत काम करणार आहेत. भारताची तिन्ही संरक्षण दले अमेरिकेकडून अशाप्रकारचे 18 ड्रोन्स प्राप्त करण्याच्या तयारीत आहेत. तर चीन पाकिस्तानला 48 जीजे-2 ड्रोन उपलब्ध करणार आहे.
Previous Article6 हजार कोटींचे भांडवल केंद्र सरकार गुंतवणार
Next Article शंकरगौडा पाटील यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.