ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 31 हजार 118 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 482 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 94 लाख 82 हजार 810 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 621 एवढी आहे.
सोमवारी दिवसभरात 41,985 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 35 हजार 603 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 88 लाख 89 हजार 585 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 14 कोटी 13 लाख 49 हजार 298 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 69 हजार 322 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.30) करण्यात आल्या.









