वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत मुष्टीयुद्धमध्ये भारताला महिलांच्या विभागात कांस्यपदक मिळवून देणारी लोव्हलिना बोर्गोहेन हिला आगामी महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आल्याची माहिती भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने दिली आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱया भारताच्या महिला मुष्टीयुद्ध संघात आगामी होणाऱया राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेतील विविध वजनगटातील सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांचा समावेश राहील. 21 ऑक्टोबरपासून हिसार येथे राष्ट्रीय मुष्टीयद्ध स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. मात्र 69 किलो वजन गटात टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यविजेत्या लोव्हलिनाला थेट प्रवेश देण्यात आला आहे. महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात इस्तंबुल येथे होणार आहे.









