ऑनलाईन टीम / कोलकाता :
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते जात होते.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विजयवर्गीय यांच्या गाडीवर दगडफेक केली.
यापूर्वी देखील तृणमूलवर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप होत आला आहे. तृणमूलने मात्र हे आरोप फेटाळून लावले. दरम्यान, जे.पी नड्डा दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर आहेत. आज त्यांचा दौऱ्याचा हा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.
जे.पी नड्डा यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले पक्षाचे बॅनर देखील फाडण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये ‘जंगल राज’ सुरू असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी केला.भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय म्हणाले की, बंगालमध्ये कायद्याचे राज्य संपले आहे. विरोधी पक्षांना त्यांचे कार्यक्रम घेण्याची परवानगी मिळत नाही. राज्यात जंगल राज्य सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने मात्र हे आरोप ‘निराधार’ आणि ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित’ आहेत असे म्हटले आहे.
- … म्हणूून मी सुरक्षितत : नड्डा

हल्ल्यावर जे पी नड्डा यांनी सभेत बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली असून म्हटले की, आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. जर मी आज या बैठकीत पोहोचलो आहे तर ते देवी दुर्गाच्या आशीर्वादानेच, असेही त्यांनी यावेळी सांगितले.









