प्रतिनिधी / सांगे
गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अपवाद वगळता बहुतेक पक्षांनी आपल्या उमेदरांची नावे जाहीर केली असुन उरलेले ही येत्या एक ते दोन दिवसात जाहीर होणार आहेत.याच पार्श्वभूमीवर काही उमेदवार पक्षांनी त्यांना उमेदवारांच्या यादीत स्थान दिलेले नाही. यामूळे ते आपली संपुर्ण राजकिय ताकद पणाला लावत असल्याचे चीत्र आहे.
तर दुसरीकडे काही राजकिय नेते वेगवेगळी भुमिका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सावित्री बाबू कवळेकर यांनी गोवा राज्य भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून कार्यकर्त्यांच्या जोरावर सांगे मतदारसंघांमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सावित्री कवळेकर यांनी सांगे येथील गुरुकुल सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे माजी अध्यक्ष नवनाथ नाईक, उपाध्यक्ष सदानंद गावडे, माजी अध्यक्ष आनंद नाईक, सरचिटणीस सुदेश भंडारी, एसटी मोर्चा अध्यक्ष महेश गावकर, प्रशांत सगुण गांवकर यांच्यासह सांगे भाजप मंडळ व बूथ स्थरावरील 33 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याची माहिती नवनाथ नाईक यांनी दिली.









