प्रतिनिधी / पणजी
भाजपच्या गोवा प्रभारीपदी चिकमगरवल्ली थिम्मे गौडा रवी या कर्नाटकमधील मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. टी. रवी या नावाने ते ओळखले जातात. आतपर्यंत चार वेळा कर्नाटकातील चिकमंगळूर मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. कर्नाटकाचे कला व संस्कृती मंत्री या नात्याने त्यांनी काम केलेले आहे. सध्या ते भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांची बुधवारी भाजपने गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती केली.









