खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बरेच कार्य केले आहे. त्यामध्ये कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या तालुक्यातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य संपूर्ण राज्यात कौतुकास पात्र ठरले आहे, असे उद्गार कर्नाटक राज्य भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. संदीप कुमार यांनी खानापूर येथील शिवस्मारकात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले.
तालुक्यातील भाजपा युवा मोर्चाचे पंडित ओगले आणि त्यांच्या सहकाऱयांनी अंत्यसंस्काराच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी खानापूरला येऊन सर्वांचा सत्कार केला. राज्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. संदीप कुमार, राज्य प्रधान कार्यदर्शी डॉ. मल्लिकार्जुन बाळेकाई, डॉ. अजित हेगडे, राज्य सेपेटरी इराण्णा अंगडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीमध्ये भाजप युवा मोर्चाचे पंडित ओगले आणि त्यांचे सहकारी मारुती जाधव, गोपाळ भेकणे, किरण बाचोळकर, जॉर्डन गोन्साल्विस, रघुनाथ गुरव, विनायक हणमशेठ, रोहीत गुरव, जोतिबा कुंभार, सिद्धार्थ गुरव, श्रीधर कत्तीशेट्टी, अजित धामणेकर, आत्माराम करगार, मारुती ओमनगोळ, सुनील पेजोळी, रवी पाटील, शंकर पाखरे, भरमाणी पाखरे तसेच बजरंग दलचे अमोल परवी, अनिकेत गावडे, माऊली पाटील आदींचा समावेश होता. या सर्व कार्यकर्त्यांच्या सेवेचे राज्य पदाधिकाऱयांनी यावेळी वेशेष कौतुक केले. कोरोना केअर सेंटरची सुरुवात करून कोरोना बाधितांना दिलासा दिल्याबद्दल किरण यळ्ळूरकर, सदानंद पाटील, अनंत पाटील आदींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष बसवराज नेसरगी, जिल्हा जनरल सेपेटरी सुनील मड्डीमनी, तालुका अध्यक्ष दर्शन किल्लारी, नगरसेवक आप्पय्या कोडोळी उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चा राज्य अध्यक्ष डॉ. संदीप कुमार यांनी शिवस्मारक येथील सत्कार समारंभ झाल्यानंतर पंडित ओगले यांच्या बरोबर महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांना फळे वाटप केली.
तेथे त्यांचे स्वागत श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे प्रणेते विठ्ठलराव हलगेकर, सेंटरचे अध्यक्ष किरण यळ्ळूरकर, उपाध्यक्ष पंडित ओगले व सेपेटरी सदानंद पाटील यांनी केले व कोविड केअर सेंटरची माहिती दिली. त्यांनी हलगेकर यांच्या कार्याचे कौतुक केले व सर्व डॉक्टर, नर्सिंग व ऑफीस स्टाफचे अभिनंदन केले. यावेळी ऍड. आकाश अथणीकर, संतोष दप्तरदार, राज गावडे, अशोक नेसरीकर उपस्थित होते.









