आप ने दरवाढीवरून भाजपला फटकारले
प्रतिनिधी/ मडगाव
जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून आम आदमी पक्षाने बुधवारी भाजप सरकारवर सडकून टीका करत भाजप ‘खास आदमी’चे सरकार असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून आपने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि भाजप सरकारचा ‘अच्छे दिन’ कुठे गेला, असा सवाल सदस्यांनी केला.
मडगाव येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आपच्या नेत्या पॅट्रिशिया फर्नाडिस म्हणाल्या, ‘गोवा डेअरीने अलीकडे दुधाच्या दरात लिटरमागे 4 रुपयांनी वाढ केली असताना, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. कोविडमुळे बऱयाच लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. अशावेळी सामान्य लोकांना दरवाढीचाही फटका बसला आहे’.
पॅट्रिशिया फर्नांडिस यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याबाबत राज्य भाजपा महिला मोर्चाच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्या रोड शोची वाट पाहत असल्याचीही त्यांनी टिप्पणी केली.
माध्यमांनी सुलक्षणा सावंत यांना राज्यातील वाढत्या इंधन, घरगुती गॅस सिलिंडर आणि दुधाच्या किंमती यावर भाष्य करण्यास सांगितले असता सावंत यांनी आपल्या पतीच्या आवडत्या वाक्मयाचा वापर केला, ‘भिवपाची गरज ना’. ‘खास आदमी’साठी काम करणाऱयांना ‘आम आदमी’चे दुःख समजणार नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
आपचे उपाध्यक्ष ऍड. सुरेल तिळवे म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यास सामान्यांना दरवाढीचा फटका बसणार असल्याचा इशारा ’आप’ ने आधीच दिला होता. ते म्हणाले, ‘अनेक विशेष व्यक्ती, ज्ये÷ नागरिक आणि एचआयव्हीग्रस्त लोकांना गेल्या चार महिन्यांपासून सरकारकडून त्यांचे मासिक अर्थसहाय्य मिळालेले नाही. यापैकी बरेच जण पूर्णपणे सरकारच्या मासिक अनुदानावर अवलंबून आहेत. मात्र, भाजप सरकार कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करण्यात व्यस्त आहे.









