प्रतिनिधी/ बेळगाव
मुळचा नागनूर (ता. बैलहोंगल) येथील राहणारा व सध्या भाग्यनगर नवव्या क्रॉसवर राहणारा अनिल सिध्दराम करेरुद्रण्णावर (वय 19) हा तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दि. 16 जुलै रोजी सकाळी नेहमी प्रमाणे अनिल कामावर गेला होता. व्हॅक्सीनडेपो नजीकच्या पोस्ट ऑफीसजवळ प्रमोद शंकर बालाजी या मेस्त्राrकडे तो कामावर गेला होता. सायंकाळी काम संपवून घरी जाण्याचे सांगून हा तरुण तेथून बाहेर पडला. मात्र तो घरी पोहोचला नाही.
त्याची आई निलव्वा यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 5.6 फूट उंची, गहू वर्ण, लांब नाक असे त्याचे वर्णन आहे. कामावरुन बाहेर पडताना या तरुणाने आपल्या अंगावर काळी पॅन्ट व काळे जॅकेट परिधान केला होता. या तरुणा विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405236 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









