मनसेचे प्रांताधिकाऱयांना निवेदन : कोविडसाठी महात्मा फुले योजनेचा लाभ द्या!
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्ग जिह्यातील कोविड आजाराकरिता खाजगी डॉक्टर सेवा देत असल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिनंदन करीत आहे. पण काही रुग्णालयातून मोठय़ा प्रमाणात बिल आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांना योग्य समज देण्यासोबतच जी रुग्णालये महात्मा जोतिबा फुले आरोग्य अभियानांतर्गत नोंदणीकृत आहेत. तेथे या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी मनसेच्यावतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आलेल्या या निवेदनावेळी तहसीलदार रमेश पवार मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr, शांताराम सादये, संतोष कुडाळकर उपस्थित होते. ज्या रुग्णालयांत ही योजना आहे, तेथे रुग्ण, नातेवाईकांना याबाबत कल्पना देण्यात यावी. कोविड हा आजार या योजनेअंतर्गत असून त्या आजाराला दिलेली मर्यादा आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यास तो खर्च स्वखर्चाने द्यायचे आहेत. नियमावलीबाबत हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाकडे सुस्पष्ट व ठळक अक्षरात बोर्ड लावण्यात यावेत.
शासनाच्या 26 ऑक्टोबर 2020 च्या ‘मेमोरेण्डम’प्रमाणे बिल न अकारता, जादा आकारणी करत आहे. यात जर 8 दिवसात बदल झाला नाही तर आपल्या कार्यालयामसमोर कोविडचे नियम पाळून तोंडावर काळय़ापट्टय़ा बांधून शासनाचा निषेध आंदोलन जनतेला सहभागी करून केले जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.









