हब्बनहट्टीजवळ मलप्रभा नदीकाठावर प्रतिमांचे एकत्रितपणे पूजन
प्रतिनिधी / बेळगाव
देव-देवतांच्या भग्न प्रतिमा नदीकाठावर व वेगवेगळय़ा झाडाखाली टाकून देण्याचे प्रकार रोखण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करणारे वीरेश हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी गोळा केलेल्या प्रतिमांवर अग्निसंस्कार करण्यात आले. खानापूर तालुक्मयातील हब्बनहट्टीजवळ नदीकाठावर प्रतिमा एकत्र करून त्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विधिवत अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी देवांची विटंबना टाळण्यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले.









